सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांचा वर्दीचा प्रश्न मार्गी लागला.
प्रतिनिधी : शंकर माने
आज मंत्रालय मुंबई येथे सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक यांचा युनिफॉर्म (पोषाख) कलर बदल करणेबाबत मा. मानसिंग नाईक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेचा अध्यक्षा श्रीमती आश्विनीताई सोनावणे, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार मंडळांचे पदाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्मचा (पोशाख) कलर सशस्त्र दले व पोलीस दल यांच्या युनिफॉर्मशी मिळता जुळता राहू नये याची खबरदारी घेतली जावी. यासाठी सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्मच्या कलरबाबत गृह विभागाची संमती घेऊनच युनिफॉर्म (पोशाख) कलर निश्चित केला जाईल, अशी ग्वाही दिली.
सुरक्षा रक्षकाला देण्यात येणारा युनिफॉर्म (पोशाख) चा रंग चांगला असावा. तसेच आलेल्या युनिफॉर्मच्या कलरचे नमुने कापड (सॅम्पल) गृह विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यास गृह विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या युनिफॉर्म (पोशाख) साठी तो कलर अंतिम करून याबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल.


