भादे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार- मा.आनंदराव शेळके-पाटील
संपादक दिलीप वाघमारे
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने
मा.आनंदराव शेळके-पाटील
(मा.सभापती समाजकल्याण समिती,जि.प.सातारा)
याच्या अध्यक्षतेखाली व
मा.देविदास चव्हाण (पुर्व मंडल अध्यक्ष,भाजपा खंडाळा)
यांच्या उपस्थितीत भादे जिल्हा परिषद गटातील गावांच्या प्रमुख मान्यवरांची बैठक वीर धरण विश्रामगृह येथे संवाद बैठक पार पडली.
यावेळी बोलताना आनंदराव शेळके-पाटील म्हणाले की १९९२ पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नेतृत्व करत असले पासून आज पर्यंत जनतेच्या विकासकामांना कुठेही कमी पडलो नाही, जनतेने प्रत्येक वेळी माझ्या कामाची पोहोच पावती निवडणुकीच्या माध्यमातून मला दिलेली आहे. यापुढील काळात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योग्य तो चेहरा भादे गट व भादे व नायगाव गणांसाठी देणार आहोत, त्यामुळे केलेल्या विकासकामाच्या आधारे व ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे यावेळी भादे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार असल्याचे शेळके-पाटील म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या सूचनेनुसार लवकरच जयकुमार गोरे भाऊ व भाजपा अध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांचा संयुक्त दौरा भादे गटात घेणार असल्याचे पूर्व मंडल अध्यक्ष देविदास चव्हाण यांनी सांगितले.
भादे जिल्हा परिषद व दोन्ही गणांसाठी पक्ष जो चेहरा देईल त्याला निवडून आणण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले जातील, लवकरच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सूचनेनुसार प्रत्तेक गावचा दौरा करून प्रत्येक गावात झालेल्या विकासकामाची उद्घाटन व अपेक्षित असणारे विकास कामांची यादी व भाजपने राबविलेल्या प्रत्तेक योजना घराघरात पोहचविणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी सांगितले.
यावेळी, प्रदेशचे निखिल झगडे, बाळासाहेब जाधव, शिवाजी कोकरे, दादासो धायगुडे यांची भाषणे झाली.
संवाद मेळाव्यात भादे पंचायत समिती सदस्य शोभा जाधव, शरदकाका देशपांडे, गोरखराव धायगुडे, भास्करराव कदम, प्रकाश कराडे, श्रीधर सोनवलकर, विकास ननवरे, अंदोरी मा.सरपंच प्रदीप होळकर, शेडगेवाडी सरपंच हाके, कराडवाडी उपसरपंच दिलीप कराडे, मरिआईचीवाडी चेअरमन मोहन कुंडलकर, शेडगेवाडी मा.सरपंच नारायण ठोंबरे, अनिल नरूठे, अनिकेत चौधरी, किसन धायगुडे अन्य मान्यवर उपस्थित होते.


