जि प प्राथ शाळा न्हावी शाळेची राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेची दमदार सुरुवात
मंगेश पवार
सारोळे :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी येथील विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा मध्ये इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु.जिज्ञासा प्रवीण सोनवणे हिने 150 पैकी 132 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दहावा तर पुणे जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.या यशामागे तीचे आई-वडील तसेच वर्गशिक्षिका श्रीम. रुपाली पिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच,इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु.अनन्या प्रमोद सोनवणे हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत 150 पैकी 130 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात अकरावा व पुणे जिल्ह्यात सहावा क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशासाठी तीचे आई-वडील व वर्गशिक्षक श्री.अनिल चाचर यांचे मार्गदर्शन लाभले.


या दोन्ही विद्यार्थिनींच्या अभिमानास्पद यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी मा.चंद्रकांत विपट , गटशिक्षणाधिकारी मा. संघरत्न सरोदे , विस्तार अधिकारी मा. सचिन लोखंडे, विस्तार अधिकारी मा. शेख हुमेरापरवीन ,न्यू इंग्लिश स्कूल न्हावी,मुख्याध्यापक मा.संजय कांबळे,ग्रामपंचायत न्हावी 322 च्या सरपंच तथा प्रशासक मा.शीतल सोनवणे,ग्रामपंचायत न्हावी 15 चे सरपंच तथा प्रशासक मा.भरत सोनवणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.शरद सोनवणे,ग्रामविकास अधिकारी विजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका ललिता भोसले,तसेच पालक, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


