क्रांतीसूर्य फुले जयंती उत्साहात साजरी


पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर

शहरातील वडगाव कोल्हाटी, गट नं. 11, बजाज नगर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी महामानवांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र जमले होते.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या “मी माझे वृक्ष हे खडका वरती लावले आहे, ज्याला फळे उशिरा येतील पण ती सकस व पौष्टिक असतील” या प्रेरणादायी विचाराचा उल्लेख करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. आकाश गायकवाड व रमेश वाघमारे उपस्थित होते. तसेच परिसरातील महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे नियोजन गोविंद लोंढे यांनी केले होते. यावेळी “आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीतील प्रतिनिधी राहुल जोगदंडे, उमेश मळीकर, विजय जाधव, अशोक चाळक, नितीन सिरसाठ, रमेश गवळी, नारायण ओवळेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!