पाडेगावात हैदोस घालणाऱ्या भोंदूबाबाला पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार— डी.पी.आय जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड
संपादक दिलीप वाघमारे
पाडेगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील गट नंबर ०९ या शासनाच्या जागेत अनधिकृत मठ टाकून हैदोस घालणाऱ्या भोंदू बाबा वरती कारवाई करण्यासाठी वेळोवेळी निवेदन दिलेले आहे.
परंतु शासकीय अधिकारी त्या बाबाला पाठीशी घालत असल्याने तसेच परिसरातील त्या भोंदू बाबाच्या टोळीतील गुंडांच्या दादागिरीच्या मदतीने त्याबाबाने निरा लोणंद रोडवर रस्त्याकडेला अनधिकृत मठ टाकून सर्व समस्यांवर १००टक्के दैवी उपचार म्हणून पूर्णपणे हैदोस घातलेला आहे.
यासंबंधी आज दिनांक ०८ रोजी पाडेगावच्या तलाठी दळवी मॅडम व मंडलाधिकारी यादव मॅडम यांना फोन द्वारे तसेच निवेदन देऊन परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा एकदा सांगितलेली आहे. त्या ठिकाणी अनधिकृत मठ टाकणारा भोंदूबाबा विठ्ठल किसन गायकवाड, दत्तात्रय विठ्ठल गायकवाड, भागुबाई विठ्ठल गायकवाड व व त्यांच्यासोबत अतिक्रमण करून जादूटोणा व भोंदूगिरी करणाऱ्या गुंडांच्या टोळीला तात्काळ पोलीस संरक्षणामध्ये नोटीस देऊन संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात यावे असे निवेदन दिले आहे.
तरीही त्या भोंदूबाबावर कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करून आंदोलन करणार आहोत असा इशारा डी.पी. आय जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिली आहे.


