खोपी येथे रोटरी क्लब पुणे यांच्या सहकार्याने मुकिंदा भोसले यांचे घरकुल पुर्ण.


[

विशाल शिंदे

भोर :- रोटरी क्लब पुणे विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये सक्रिय आहे, ज्यामध्ये शैक्षणिक, आरोग्य आणि सामुदायिक विकासाच्या उपक्रमांचा समावेश होतो. ग्रामपंचायत खोपी कांबळे बौद्ध विहार,कांबळे वस्ती या ठिकाणी मुकिंदा भोसले यांचे घरकुल पुर्ण करण्याकरिता रोटरी क्लब पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ADVERTISEMENT

 

या करिता शालिनी कडू जिल्हा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे व गट विकास अधिकारी किरण कुमार धनवाडे पंचायत समिती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लबचे त्याचप्रमाणे पंचायत समिती भोरचे मा. गट विकास अधिकारी किरण कुमार धनवाडे,विस्तार अधिकारी घोगरे, खोपी गावचे विद्यमान सरपंच तुषार कांबळे,उपसरपंच सनी शिवरकर, माजी सरपंच कृष्णा शिवरकर ग्रामपंचायत अधिकारी दिपक सुरवसे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मारणे सागर मारणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

 गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा कातकरी समाजाची कुटुंब आहेत त्यांना अशा पद्धतीने मदत झाली तरी त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल असं मत व्यक्त केले.रोटरी क्लब पुणे यांच्या वतीने भोर तालुक्यातील पाच घरकुलांना मदत करून सदरचे घरकुले पूर्ण करणेत आली

तुषार कांबळे सरपंच..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!