शिवराज्यभिषेक दिनानिमित्त सारोळे गावात रक्तदान शिबिर! शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
संपादक : मंगेश पवार
सारोळे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने राज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामस्थ मंडळ सारोळे यांच्या आणि अक्षय ब्लड बँक संयुक्त विद्यमाने (ता. ९) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात ,उपसरपंच झुंजार धाडवे ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच आणि भोर कृषी उत्पन्न संचालक महेश धाडवे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम महांगरे,सामाजिक कार्यकर्ते जालिंदर शिंदे, सोसायटी सदस्य अशोक मोरे,मा. उपसरपंच रोहिदास महांगरे,सोसायटी चेअरमन रुपेश धाडवे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ धाडवे, संतोष धाडवे,किरण धाडवे हे उपस्थित होते.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन अक्षय ब्लड बँक यांनी केले. शिबिरात जवळपास ४३ युवा आणि जेष्ठ वर्गानी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौरभ धाडवे, ओंकार घारे, तुषार धाडवे, भास्कर धाडवे,अमोल भरगुडे,बाबू धाडवे,किरण पवार, विकी महांगरे, सुरज धाडवे,शुभम धाडवे, अजय धाडवे, शुभम दळवी, योगेश राजपुरे, मिथुन दळवी ओंकार महांगरे,शुभम शेरे, सुरज राजपुरे, रोहन धाडवे,तुषार कदम आणि तरुण युवा वर्ग इत्यादी उपस्थित होते.