मुरबाडचे कवी जयराम कराळे यांच्या भावतरंग या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
प्रतिनिधी : शंकर माने
नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिले रंग धनु नवरंग साहित्य संमेलन दि. ८ जून रोजी आयोजित केले होते त्यात दुपारच्या सत्रात मुरबाड तालुक्यातील मानिवली(गों) येथील संवेदनशील कवी श्री जयराम महादू कराळे यांच्या “भाव तरंग” या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे यांच्या शुभ हस्ते नवी मुंबईत सीवूड येथील ठाकूर हॉल सेक्टर 44 प्लॉट क्रमांक 67, 68 येथे मोठ्या थाटामाटात झाले. त्याप्रसंगी इतिहासाचार्य काशिनाथ मढवी, अनिल मुनघाटे, घनश्याम परकाळे, आदर्श शिक्षक मारुती बागडे, गज आनन म्हात्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्या प्रसंगी कवी संमेलन सुद्धा आयोजित केले त्यात 40 हून अधिक कवींनी कविता सादर केल्या. मुरबाड, कल्याण, उल्हासनगर ,उरण, नवी मुंबई, अलिबाग, पेण, ठाणे, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून कवींनी कवी संमेलनासाठी हजेरी लावली. कवी सुरेश जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच आभार प्रदर्शन श्री शामराव सुतार यांनी केले. तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


