स्वरा वांगडे राज्यस्तरीय वाचन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
जावली , मेढा :- जिल्हा परिषद केंद्र शाळा मेढा ची विद्यार्थिनी स्वरा संजय वांगडे हिला आई प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय वाचन पुरस्काराने गौरविण्यात आले.हा पुरस्कार सोहळा फलटण येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेश तांबे आदींच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. स्वराला मार्गदर्शक शिक्षिका अनुपमा दाभाडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. स्वराने आज पर्यंत अग्निपंख, श्यामची आई, साने गुरुजी, एक होता कार्व्हर, पावनखिंड, राधेय, श्रीकृष्ण अशी अनेक पुस्तके वाचून अभिप्राय दिला होता. इंटरनेटच्या वाढत्या युगातही वाचनाची आवड जोपासणारी मेढा केंद्र शाळेची विद्यार्थिनी स्वरा वांगडे हिने आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणासमूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळी मेढा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रतापराव धनावडे तसेच सर्व शिक्षक स्टाफ, शालेय व्यवस्थापन समिती, मेढा ग्रामस्थ, पिंपरी ग्रामस्थ,वेदांत क्लासेस तसेच जावली तालुका केमिस्ट असोसिएशन यांनी स्वरा चे अभिनंदन केले.