भोर तालुक्यातील बारे येथे विकासकामांचे उद्घाटन


मंगेश पवार

भोर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील मौजे बारे खुर्द येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार स्थानिक आमदार निधीतून हाती घेण्यात आलेल्या विकासकामांचे उद्घाटन मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये समाजमंदिर बांधकामासाठी रु. ५ लाख तर विश्वनाथ गायकवाड घर ते भोर-पसुरे रस्ता बांधकामासाठी रु. १५.१० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमास भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल गोरे, खरेदी-विक्री संघाचे संचालक विजय शिरवले, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनंता दूरकर यांच्यासह माऊली दानवले, पंढरीनाथ राजीवडे, सरपंच सविता गायकवाड, उपसरपंच सारिका बदक, सदस्या सुमन बदक, माजी उपसरपंच सुरेश खुटवड, हनुमंत बदक, बारे बु.चे माजी सरपंच सागर दानवले, अनिल गायकवाड, लक्ष्मण खुटवड, दिलीप खुटवड, सुरेश खुटवड, सत्यवान तळेकर, समीर खुटवड, सागर बदक, दिलीप मांढरे, सचिन चंदनशिव आदींसह ग्रामस्थ, महिला व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!