”उद्योगांवर दबाव नको – अजितदादांचा थेट इशारा! काम मागण्यासाठी दादागिरी केली, तर थेट मकोका!
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे प्रतिनिधी :- पुणे हे माहिती तंत्रज्ञान व उद्योगनगरी म्हणून ओळखले जाणारे शहर असून अनेक मोठ्या कंपन्या येथे गुंतवणुकीस उत्सुक आहेत. मात्र काही मंडळी उद्योगपतींवर दबाव टाकून ‘आमच्या माणसांनाच काम द्या, कंत्राट द्या, आमच्या दरानेच काम करा’ असे सांगतात. ही दबावाची मानसिकता न थांबवल्यास पुण्याचा विकास अशक्य आहे,” असे परखड मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच व्यक्त केले.
फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तितक्याच रोखठोक भाषेत उत्तर दिले आहे. “महाराष्ट्रात कुठेही गुन्हेगारी व दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पुणे शहराचे सीपी आणि पुणे ग्रामीणचे एसपी यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणताही राजकीय कार्यकर्ता उद्योगपतींना त्रास देत असेल, तर त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करा. जर चार वेळा गुन्हा दाखल करूनही तो ऐकत नसेल, तर त्याच्यावर मकोका लावा,” असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
राज्याच्या औद्योगिक विकासात गुंतवणूकदारांचे विश्वास टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आता पुढे या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.


