आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, चालकांचा खून करून दरोडा टाकण्याचे होते नियोजन, स्थानिक गुन्हे शाखा आळेफाटा पोलिसांची कामगिरी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,
कलावती गवळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
प्रवास करण्याच्या बहाण्याने शेअरिंग टॅक्सीत बसून तिघा सराईतांनी कारचालकाचाच खून केला त्यानंतर संबंधित कार कसारा घाटात सोडून ते पसार झाले, राजेश बाबुराव गायकवाड (वय 56) रा निधी आपारमेंट जेलरोड नाशिक ) असे मृत चालकांचे नाव आहे, ही घटना 27 जानेवारी रोजी घडली होती, या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात संबंधित राजेश गायकवाड यांचा मुलगा अंकुश गायकवाड (वय 30) याने तक्रार दाखल केली होती, त्यानुसार आळेफाटा पोलिसांसह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करीत या खून प्रकरणातील आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, विशाल आनंद चव्हाण (वय 22 ) मयूर विजय सोळसे (वय 23) आणि ऋतुराज विजय सोनवणे (वय 21) तिघे रा. नाशिक ) अशी सराईत आरोपींची नावे आहेत, तसेच या आरोपींचा गाडी चोरून अहिल्यानगर येथील एका साने चांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्लॅन होता, या दरोड्यापूर्वी त्यांना कोणताही गंभीर गुन्हा करायचा नव्हता, मात्र मारहाणीत कार चालक राजेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने त्यांनी नाशिककडे जाण्याचा पर्याय निवडला होता, राजेश गायकवाड हे 27 जानेवारी रोजी आपल्या मालकीच्या ताब्यातील ईरटीका कार (एमएच 15 जेडी 5193) घेवून काही कामानिमिंत्त पुण्याला आले होते रात्री दहाच्या सुमारांस त्यांच्या आईच्या मोबाईलवर एकाने फोन करत त्यांचा मोबाईल पुणे-नाशिक हायवे लगत संतवाडी रोडवर मिळाल्याचे सांगितले, त्यानंतर शोध घेऊनही राजेश न सापडल्याने ( दि. 28 जानेवारी ) रोजी राजेश गायकवाड यांच्या बद्दल मिसिंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारांस संतवाडी परिसरांत राजेश यांचा मृतदेह आढळून आला, यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तात्काळ पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आणि आळेफाटा पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या, अखेर कोणतेही धागेद्वारे नसताना ही पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलिसांनी अगदी शिताफीने तपास कारचालक राजेश गायकवाड यांच्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला, आणि आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत, सदर कारवाईत सहभाग घेतलेल्या पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांचे अधीक्षक पंकज देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे विशेष कौतुक होत आहे,