आपत्कालीन सेवा पुरवल्या बद्दल किकवी येथील डॉ मंदार माळी इमर्जंसी ऑफिसर १०८ यांचा तत्पर सेवेबद्दल सत्कार.


खंडाळा प्रतिनिधी :धर्मेंद्र वर्पे

ग्रामीण भागात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. दुर्गम भागात तर रुग्णांचे सर्वाधिक हाल होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने मेडिकल सर्व्हिसेस या प्रकल्पांतर्गत 2014 पासून राज्यात डायलेक्शन केली.108 रुग्णवाहिकांना सर्वात जास्त कॉल हे गर्भवतींसाठी आणि अपघात ग्रस्तांसाठी असतात. एखाद्या मातेला कळा सुरू होतात नातेवाईक रुग्णवाहिकेला कॉल करतात. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये धाव घेत किकवी येथील डॉ.मंदार माळी हे रुग्णवाहिकेचे पायलट विशाल कदम यांना सोबत घेऊन गर्भवतीला रुग्णालयात सुखरूप पोहोच करतात.तसेच रस्त्यावरती कुठेही अपघात झाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेला कॉल येतो. त्यावेळी तत्परतेने फार कमी वेळात रुग्णाला दवाखान्यात पोहोचवण्याची व्यवस्था करतात. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर घाटात अपघात झाला त्यावेळी डॉ.मंदार माळी यांनी एका अपघात ग्रस्त युवकाचे प्राण वाचवले.

 

शिरवळ रेस्कू ची आपत्कालीन टीम शिरवळ ग्रामपंचायत तसेच निर्भीड पत्रकार संघ यांच्या तर्फे तसेच माननीय अजित पाटील सातारा येथील तहसीलदार व टॉफिक पोलिस तसेच खंडाळा शिरवळ पोलिस पडळकर यांच्या उपस्थित रोड अपघात तसेच डिलीवरी पेशेंट व आपत्कालीन सेवा योग्य वेळेत पुरवल्या बद्दल तसेच पुणे जिल्हा बरोबरच सातारा येथेही वेळेत सेवा पुरवल्या बद्दल किकवी येथील १०८ एम्बुलेंस चे डॉ मंदार सुरेश माळी इमर्जंसी ऑफिसर १०८ किकवी यांचा तत्पर सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच १०८ आपत्कालीन सेवा अशीच अखंडित राहो त्यासाठी पुणे डिस्ट्रिक्ट मैनेजर १०८ डॉ प्रियांक जावळे सर तसेच झोनल मैनेजर डॉ विठ्ठल बोडके सर १०८ पुणे सातारा जिल्हा व एडीएम सुजित पाटील सर यांचे विशेष आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!