नसरापूर राम मंदीराला टाळा.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून प्रसिध्द असलेल्या नसरापूर ग्रामदैवत श्रीराम मंदीर शनिवार दि.१२ विजयादशमी (दसरा) पासून टाळा लावून बंद केल्याने नसरापूर भाविकांचा रोष वाढत चालला आहे. मंदीराचे ट्रस्टीचा कौटुंबिक वाद मंदिर अस्मितेला धक्का पोहचवत आहे.
याबाबत राजगड पोलीसांना
ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज करून ही अद्याप मंदिर खुल्ले केलेले नाही.
नसरापुर येथील श्रीराम प्रभूचे ऐतिहासिक मंदिर आहे. भोर पंतसचिवांनी काळात मंदिर बांधून दिल्याची समजत आहे. उमाजी नाईक , लोकमान्य टिळक व अनेक मान्यवराच्या स्वातंत्र्य काळातील बैठका झाल्या. रामनवमी उत्सव भोर व नसरापुर नेहमीच चर्चेत असतो. श्रीराम मंदिर बंद ठेवल्यामुळे ग्रामस्थांना व भाविकांच्या भावना दुखवल्या जात आहे.
याबाबत श्रीराम मंदिर ट्रस्टी प्रकाश कार्येकर व ग्रामस्थांनी राजगड पोलीसांना लेखी अर्ज केलेले आहे. तात्काळ मंदिर खुले करावे आशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.
मंदिर ट्रस्टी प्रकाश कार्येकर यांची बहिण वृध्दा कार्येकर यांनी दसऱ्या दिवशी बंद केले. कौटुंबिक वादात श्रीराम दर्शनासाठी येणाऱ्याच्या भावना दुखावल्या जात आहेत. कौटुंबिक वाद आपआपसातील मालमत्तेसाठी अथवा अंतर्गत संबधामुळे असू शकतो. जनसामान्या यांच्याशी काडीमात्र संबध नाही.
दिपावली सणासुध्दी नसरापुर ग्रामदैवत कुलूप लावल्याने दर्शनास व दिवाबत्ती करण्यासाठी तात्काळ मंदिर खुल्ले करावे आशी ग्रामस्थांची मागणी केली आहे.



