सावली शाळेत शैक्षणिक उठावाला उदंड प्रतिसाद! शाळेला मिळाले तिन लाखाचे साहीत्य


 

सातारा पुण्यभुमी प्रतिनिधी : – बजरंग चौधरी

शिक्षणाचं माहेरघर असलेलं जावली तालुक्यातील केंद्र शाळा सावली येथे ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी भरघोस अशी तीन लाखाची मदत करून शाळेच्या जवळ जवळ सर्व भैतिक सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

जावली तालुक्यात शैक्षणिक दृष्टया सक्षम असलेल्या सावली या गावचे नाव अग्रस्थानाने घेतले जाते. शैक्षणिक दृष्टया सक्षम असलेल्या ग्रामस्थ यांच्या दातृत्वामुळे हे शक्य झाले.

गावच्या एकतेसाठी सतत अजिंक्य असलेले अजिंक्य नेहरू युवा मंडळ सावली व श्री. काळेश्वरी प्रतिष्ठाण मंडळ मुंबई / पुणे यांना केलेल्या आव्हानाला सर्व ग्रामस्थानी एकत्र येऊन प्रतिसाद देऊन उत्स्फुर्त अशी शाळेला मदत केली.

अध्यक्ष विनोदकुमार जुनघरे यांची धडपड व शाळेच्या गुणवैशिष्ठ्याला साजेशी अशी मदत झाली पाहिजे यासाठी अहोरात्र तरूणांशी बोलून व शाळेच्या नावलैकिकाला अजून झळाली यावी साठी त्यांची तळमळ ग्रामस्थांना जाणवली.

गावातील सर्व शिक्षण प्रेमी एकत्र येऊन शाळेच्या भैतिक सुविधा दळवी सर, सपकाळ ,धनावडे सर यांच्या कडून माहिती घेतली. सपकाळ व केमदारणे सरांनी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद कुमार जुनघरे यांच्या साथीने अचूक असे नियोजन करून शैक्षणिक साहित्य, भैतिक सुविधा यानी आपली केंद्र शाळा आदर्शवत होऊन ती शाळा भौतिक दृष्ट्या सुसज्ज झाली पाहिजे अशा पद्धतीने ग्रामस्थाशी चर्चा केली.

ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांचे वतीने शाळेस तीन लाखांचे ( ३, ००, ०००) शालेय उपयोगी साहित्य भेट दिले.

यामध्ये कै. किसनराव जोतीबा जुनघरे यांचे स्मरणार्थ विनोदकुमार जुनघरे (अध्यक्ष) व्यवस्थापन समिती यांचे कडून विद्यार्थीना स्पोर्ट्स ड्रेस व खो खो किट , कै. सखाराम जोतीबा जुनघरे (गुरुजी) यांचे स्मरणार्थ विश्वासराव जुनघरे (सर) यांचेकडून ४२ इंची स्मार्ट टीव्ही , कै. पांडुरंग रावजी जुनघरे (गुरुजी) यांचे स्मरणार्थ प्रशांत जुनघरे (इंजिनिअर) यांचेकडून ३२ इंची स्मार्ट टीव्ही ,कै. तात्याबा नारायण म्हस्कर (गुरुजी) यांचे स्मरणार्थ सचिन म्हस्कर यांचेकडून ३२ इंची स्मार्ट टीव्ही ,सी.सी. टीव्ही कॅमेरा संच काळेश्वरी प्रतिष्ठान मंडळ पुणे यांचेकडून ,स्वप्नील प्रकाश जुनघरे (फौजी) यांचेकडून वॉटर फिल्टर अँक्वा गार्ड ,शशिकांत आनंदराव म्हस्कर (इंजिनिअर) यांचेकडून संगीत साहित्य तबला ढोलकी ,प्रशांत भिमराव कांबळे नीलकमल खुर्चा ,

विजय कोंडीबा जुनघरे (गुरूजी) यांचेकडून फुलझाडे कुंड्या, भिंतीवरील घड्याळे

ADVERTISEMENT

हणमंत श्रीपती जुनघरे व सुरज हणमंत जुनघरे ,चप्पल स्टॅण्ड , शशिकांत तुकाराम जुनघरे (गुरुजी) , डिजीटल रूम साठी कारपेट,आत्माराम तात्याबा जुनघरे (सर) यांचेकडून शाळेस कलर भेट तसेच

दिलीप लक्ष्मण जुनघरे (ग्रामविकास अधिकारी) यांचेकडून खो – खो खेळासाठी लागणारे साहित्य ,सचिन यशवंत जुनघरे यांचेकडून शालेय कवायतीचे साहित्य ,संकेत मोहन जुनघरे यांचेकडून बॅडमिंटन साहित्य ,नामदेव सखाराम जुनघरे यांचेकडून क्रिकेट साहित्य ,आनंदा ज्ञानदेव मोरे (उपाध्यक्ष) शालेय विदयार्थ्यास बसण्यास बैठक बस्करपट्या ,विठ्ठल नारायण म्हस्कर (माजी सर्कल अधिकारी) यांच्या स्मरनार्थ सुहास विठ्ठल म्हस्कर यांचेकडून २ नग सतरंजी ,द्रौपदा कोंडीबा जुनघरे (नानी) यांच्या स्मरनार्थ श्री. एकनाथ कोंडीबा जुनघरे यांचेकडून डायस ,शामराव धोंडीबा जुनघरे (गुरूजी) यांचेकडून सिलींग फॅन ,पांडुरंग शंकर म्हस्कर (माजी अध्यक्ष) अंगणवाडीस घड्याळ भेट

,संजय धोंडीबा जुनघरे (आबा) यांचेकडून सर्व विदयार्थ्यांस शालेय कंपास साहित्य, पांडुरंग तात्याबा शेलार यांचेकडून अंगणवाडीतील सर्व विदयार्थ्यास शालेय साहित्य ,

लक्ष्मण सिताराम जुनघरे (गुरूजी) यांचेकडून शालेय साहित्य

, सुनिल संतु म्हस्कर यांचेकडून मीटर टेप, क्लॅप्र ब्लॉक , रविंद्र विठठल जुनघरे यांचेकडून शालेय साहित्य ,

कै. तात्याबा मारूती धनावडे यांचे स्मरणार्थ शरद तात्याबा धनावडे मामुर्डी यांचेकडून शालेय साहित्यासाठी रु १००००/ दिले आहेत या भेटीमुळे ज्ञानमंदिरासाठी दातृत्व आणि आस्था व शाळेबद्दल असणारी आपुलकी आणि प्रेम यातुन ग्रामस्थांचे दिसून आले.

शाळेला भरघोस मदत केल्याबद्दल सर्वांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोदकुमार जुनघरे, उपाध्यक्ष आनंदा मोरे व सदस्य कमिटी यांच्या धडपडीतून भरघोस मदत केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले .

या भरघोस मदती बदल मा.गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी ग्रामस्थांचे व अध्यक्षांचे अभिनंदन केले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सरपंच विजय सपकाळ, माजी सरपंच नंदा जुनघरे, दुर्योधन जुनघरे, विजय जुनघरे (गुरुजी),आनंदराव म्हस्कर (गुरुजी ), दिलीप जुनघरे ( ग्रामविकास अधिकारी .) संतू म्हस्कर (गुरुजी) जगन्नाथ भिलारे , धोंडीबा जुनघरे,आनंदा जुनघरे ( सदस्य ) सौ. रुपाली जुनघरे (सदस्या) पांडूरंग बिरामणे संजय कांबळे (पो. पाटील ), संजय जुनघरे. सुहास विठ्ठल म्हस्कर (उद्योजक ) रघुनाथ दळवी गुरुजी , प्रताप धनावडे ,अंकुश सपकाळ सर तसेच सर्व शिक्षक स्टाफ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!