लोणंद – लोणंद येथे श्री काल भैरवनाथ पतसंस्थेचे रविवारी उदघाटन बातमी
संपादक दिलीप वाघमारे
– लोणंद नगरीत नव्याने सुरू होत असलेल्या श्री कालभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ रविवार दि.३१/०८/२०२५ रोजी सायं. ५.०० वा. मंत्री मदत व पुनर्वसन ना . मकरंद (आबा) पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक व संस्थापक संदीप शेळके – पाटील , चेअरमन राहुल शेळके – पाटील व व्हा. चेअरमन सौ विद्या अनिल क्षीरसागर यांनी दिली .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते
मिलींददादा पाटील ,माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील ,नि. अप्पर पोलीस अधिक्षक राजेंद्र शेळके-पाटील ,येरवडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक
रविंद्र शेळके-पाटील , वाईचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर , खंडाळ्याच्या सहाय्यक निबंधक
सौ. प्रिती काळे , नगराध्यक्षा
सौ. मधुमती गालिंदे , उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी , सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
या उद्घाटन समारंभाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक संदीप शेळके ,चेअरमन राहुल शेळके , व्हा.चेअरमन सौ .विद्या क्षीरसागर , संचालकडॉ. किशोर बुटियानी , शशिकांत जाधव ,हेमंत निंबाळकर ,राहुल शहा ,आकाश पुष्पशील शेळके ,रविंद्र धायगुडे ,सौ. सारिका धायगुडे ,सौ. आशा कृष्णा सुर्यवंशी, सचिव सौ . प्रतिभा शेळके यांनी केले आहे .


