ब्रेकींग न्यूज ! वरखडवाडीत फार्म हाऊसच्या स्विमिंग पूलामध्ये १० वर्ष्याच्या मुलाचा बुडून मृत्यू
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील एका फार्म हाऊस मध्ये शुक्रवारी दुपारी स्विमिंग पुलामध्ये १० वर्ष्याच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अर्णव साळुंखे असे मृत्यू मुलाचे नाव असून त्याला उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झालेली न्हवती. याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील वरखडवाडी येथे एक फार्म हाऊस आहे. त्यामध्ये स्विमिंग टॅंक आहे. या फार्म हाऊसवर मुंबई हुन साळुंखे कुटुंब उन्हाळी सुट्टी निमित्ताने आले होते. त्यांच्यातील लहान १० वर्षाचा अर्णव हा दिसेनासा झाला म्हणून कुटूंबियांनी शोध घेतला असता तो स्विमिंग टॅंक मध्ये आढळून आला. त्याला बाहेर काढुन उपचारासाठी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.