सारोळे गावात तब्बल 200 कराटे व मर्दानी खेळ प्रशिक्षणाकडे मुला मुलींचा वाढता कल.
महिलांच्या व मुलींच्या
छेडखानीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिला संरक्षणाचा मुद्दा कळीचा मुद्दा बनला आहे. यासाठी इतरांवर अवलंबून लबून न राहता स्वतःच स्वतःच्या रक्षणासाठी सज्ज राहणे महत्त्वाचे ठरत आहे. म्हणूनच मुली महिलांच्या स्वसंरक्षणासाठी तसेच लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कराटे व मर्दानी खेळ फायदेशीर असल्याने कराटे व मर्दानी खेळ शिकण्याकडे मुला मुलींचा कल अधिक वाढला आहे. तसेच एखादा टवाळखोर छेड काढत असल्यास त्याला धडा शिकविण्यासाठी व स्वतःला फिट ठेवण्यासाठी देखील प्रशिक्षण घेणाऱ्या मुलामुलींचे प्रमाणही वाढत आहे.
समाजात मोठ्याप्रमाणावर महिला व मुलीवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहे.
• प्रशिक्षणवर्गात सहभागीना प्रशिक्षण, एकाग्रता, व्यायामाचे बडे दिले जातात. विशेष म्हणजे सध्या मुलीचे प्रमाण या वर्गाला वाढले आहे. कारण कराटेमधील व शस्त्रकला टेक्निकचा वापर केल्यास स्वतःचा बचाव करून समोरच्याला अडवू शकतो. तसेच फिटनेस साठीही त्याचा फायदा होतो.,असे प्रशिक्षक किरण साळेकर सर म्हणाले.
अनेकदा कॉलेज, क्लासेस तसेच नोकरीवरून घरी येताना मुली, महिला एकट्याा असतात अशावेळी समोरच्याला घडा शिकवण्यासाठी कराटे व शस्त्रकला येत असल्यास ते फायद्याचे ठरते.
समोरच्याला जागे वरच धडा शिकविल्यास तो परत वाट्याला जात नाही.
त्यामुळे पालक आता मुलींना कराटेचे मर्दानी खेळाचे क्लासेस लावत आहे.
असाही फायदा
कराटे मर्दानी खेळामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होऊन शरीराला बळकटी येते. यात नियमितपणे ४५ मिनिटे व्यायाम करून घेतल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते, मन प्रसत्र आणि शरीर सुदृढ राहते. त्यामुळे मुले निरोगी राहतात. त्याचप्रमाणे शाळा-महाविद्यालयांतील खेळाडूंना क्रीडा गुणांचा फायदा होतो. तसेच या खेळात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवले आहे. बदलत्या काळानुसार मुली महिला फिटनेसवर भर देत आहेत. शिवाय त्या आरोग्याबाबत सजग झाल्या असून आहारासोबत, शरीराची काळजी घेण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे.