प्रहार जनशक्ती पक्ष सहीच्या वादात भोरचे खरे प्रश्न दडले! विकासावर एकही ठोस शब्द नाही!
भोर नगरपरिषद निवडणूकीच्या नेत्यांच्या सभांमध्ये “आधी सही कोणाची?”, “आमच्या हाती सत्ता द्या” यावर मोठा गदारोळ दिसत असताना भोरच्या मूलभूत विकासाच्या प्रश्नांवर मात्र संपूर्ण शांतता असल्याची रोखठोक टीका प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.
सभांमध्ये झालेल्या भाषणांचा आढावा घेतल्यावर स्पष्ट होतं की
1) भोरचे अर्धवट प्रकल्प
2)रस्त्यांची दुर्दशा
3)पाणीपुरवठ्याची समस्या
4)शहराचा भविष्यकालीन विकास आराखडा
5) तरुणांसाठी रोजगार व उद्योग संधी
या कोणत्याही मुद्द्यावर एकाही नेत्याने ठोस योजना व आपल्या पक्षाचे विजन किंवा जबाबदारीची घोषणा केलेली नाही, असे पक्षाने म्हटले आहे.
*प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट शब्दात नमूद केले कि*
“भोरच्या जनतेला सहीच्या वादात अडकवून ठेवले. पण भोर शहराचा विकास हा सहीपेक्षा मोठा प्रश्न आहे. सर्व नेत्यांनी कोण आधी आणि कोण नंतर यावर सभा गाजवली, पण भोरचा विकास हा मुद्दा पूर्णपणे गायबच राहिला.”
“जनतेच्या मनात एकच प्रश्न — भोरची कामं कधी पूर्ण होणार? नेत्यांनी फक्त नारे दिले; योजना, विजन आणि डेडलाइन कोणत्याही पातळीवर मांडली नाही. भोरला घोषणांची आतषबाजी नको, तर प्रत्यक्ष कामांची हमी हवी.”
प्रहार जनशक्ती पक्षाने सर्व सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले “भोरच्या विकासासाठी वेळबद्ध योजना जाहीर करा. मतांसाठी नाही, तर कामांसाठी पुढे या.”


