शिंदेवाडीचे निखिल (गणेश) सोनवणे यांची शिरवळ पंचक्रोशी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकपदी बिनविरोध निवड!


मंगेश पवार

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावचे तरुण व सक्रिय सहकार कार्यकर्ते निखिल (गणेश) गुलाब सोनवणे यांची शिरवळ पंचक्रोशी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे शिंदेवाडी व पंचक्रोशी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

 

सोनवणे यांची काम करण्याची पध्दत, लोकांशी असलेला उत्तम समन्वय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील सहभाग, तसेच ग्रामविकासासाठी घेतलेली पुढाकार भावी कार्यकाळात संस्थेसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

 

संस्थेतील बिनविरोध निवड ही त्यांच्या व्यक्तिमत्वावरील विश्वासाची पावती आहे. शेतकरी-सदस्यांचे प्रश्न, सेवा सोसायटीतील सुविधा, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता राखत संस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी ते सचोटीने काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

या निवडीबद्दल चेअरमन – दत्तात्रय राऊत, उपाध्यक्ष – गोविंद जाधव यांनी निखिल सोनवणे यांचे मनःपूर्वक अभिन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!