पांडवकालीन स्वयंभु गाळेश्वराच्या यात्रेस आजपासुन सुरुवात.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
जावळी ( मेढा ) : जावळी तालुक्यातील गाळदेव येथे श्री गाळेश्वराच्या यात्रेस आज मंगळवार पासुन सुरुवात होत आहे गाळदेव येथे पांडव कालीन शंकराचे स्वयंभु स्थान आहे सदर ठिकाणी परिसरातील शालेय सहली भेट देतात गाळदेव गावाला श्री सदगुरू डाँ निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराजांचा कृपार्शिवाद लाभला आहे गाळेश्वराला बारा शिवाचा राजा, गाळेश्वर माझा असेही म्हटले जाते जावळी तालुक्यात यात्रेचा पहिला मान गाळेश्वराचा असलेचे ग्रामस्थ सांगत आहेत गाळेश्वराची यात्रा तिन दिवस सुरु असते दि १२ रोजी काकडा प्रज्वलन, दिप माळ प्रज्वलन, जागरण गोंधळ, सांस्क्रतीक कार्यक्रम व पहाटे गाळेश्वराचा छबिना होतो दि १३ रोजी दिवसभर श्री केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी तसेच परिसरातील भजनी मंडळाचा कायक्रम, मान्यवरांचे स्वागत समारंभ होणार आहे दि १४ रोजी गाळेश्वरास रुद्राभिषेक, नवसाचे नारळ फोडणे, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, महाप्रसाद त्यानंतर रात्री गाळेश्वर देवाची पालखीतुन मिरवणूक होणार आहे सदर कार्यक्रमास विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थीत राहणार आहेत सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ, गणेश मित्र, शिवप्रेरणा क्रिडा, आदिशक्ती महीला मंडळ गाळदेव यांनी केले आहे सदर कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी केले आहे