पांडे ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग ग्रामस्थांना निधी वाटप.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
सारोळे : पांडे येथील ग्रामपंचायतीमार्फत मंगळवार दि.३ रोजी गावातील १२ दिव्यांग प्रमाणपत्रधारकांना एकूण ४९ हजार दोनशे रुपये थेट खात्यावर जमा करणेत आले. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांग लोकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी दिव्यांग प्रमाणपत्रे ग्रामपंचायतीस सादर केल्यास त्यांनाही दिव्यांग अनुदान ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार आहे, असे पांडे सरपंच तेजस साळुंके यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
यावेळी वाटप करताना गावचे युवा सरपंच तेजस साळुंके, ग्रामसेवक नीलेश्री यादव, उपसरपंच रेश्मा साळुंके, सदस्य वनिता साळुंके, संद्या साळुंके, राजेंद्र कांबळे, रुक्मिणी कांबळे, गावचे प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र बाळासाहेब साळुंके, संजय चव्हाण उपस्थित होते.


