शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती, तर पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे नियंत्रण कक्षात बदली.
संभाजी पुरीगोसावी
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची पोलीस मुख्यालयात बदली झाल्याने शिरूरच्या पोलीस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे, पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्या कार्यकाळात शिरूर शहरांसह पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोनसाखळी चोरी शेतकऱ्यांचे कृषी पंप विद्युत रोहीत्र केबल चोरी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची चोरी,अल्पवयीन मुली महिला गायब होण्याचे प्रमाण असे अनेक गुन्हे त्या गुन्ह्यांची अद्यापही उकल झालेली नाही, तसेच शिरूर शहरांसह ग्रामीण भागात जुगार,मटका गांजा विक्री गुटका वेश्या व्यवसाय या अवैध धंद्यांनी चांगलाच उच्छाद मांडला होता, आता याच अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यासमोर आहे, आता शहरांसह तालुक्यांत जुगार,मटका,गुटखा विक्री अवैध दारू गांजा विक्री तसेच गॅस रिफिलींग व्यवसाय जमोत असून त्यावर आवर घालण्यास प्रयत्न होणार का…? हे पाहणी महत्वांचे ठरणार आहे, शिरूर शहरांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून यालाही आवर घालण्याचे महत्त्वांचे आहे, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी यापूर्वी पुणे,मुंबई या ठिकाणीही विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे, सध्या शिरूरकरांकडूंन नव्या पोलीस निरीक्षकांकडूंन दबंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, लवकरच शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार आहेत.


