मामुर्डी प्राथमिक शाळेतर्फे मतदार जागृती.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
जावली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी यांच्या वतीने मामुर्डी येथे मतदार जागृती करण्यात आली.शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी मतदान फेरीच्या माध्यमातून लोकांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी मतदान जागृती कार्यक्रम प्राथमिक शाळा मामुर्डी यांनी आयोजन केला होता . प्राथमिक केंद्र शाळेतील शिक्षक विध्यार्थी यांनी घरो घरी जाऊन मतदान जागृती केली. तसेच संपूर्ण गावात जाऊन शंभर टक्के मतदान करावे अशी जन जागृती करण्यात आली.मतदानासाठी सर्व मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी नं पडता निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावे, दि. २० नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असा संदेश देणेत आला
यावेळी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व विध्यार्थी सहभागी झाले होते.
मतदानाचा हक्क बजावा,मातृभूमीची शान वाढवा, जागरूक मतदार आपले मतदान, लोकशाहीचा प्राण, लोकशाहीचा आधार, चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया, लोकशाही रूजवूया, १८ वर्षाचे वय केले पार,मिळाला मतदानाचा अधिकार. उद्याच्या भविष्याची कल्पना करा आणि योग्य पध्दतीने मत द्या, छोडकर सारे काम, चलो करे मतदान, चला जावूया मतदान करायला, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, वृध्द असो वा जवान सर्वजण करा मतदान अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मामुर्डी गावातील सुजाण मतदारांनी विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये 100 टक्के सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यामध्ये सक्रिय पुढाकार घ्यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शने पावन झालेल्या मामुर्डी नगरितील मतदारांनी १००% मतदान करण्याचे आवाहन करनेत आले
मतदान जागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, श्री केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी यांनी सहकार्य केले.