ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलची तिसऱ्या वर्षाची मॅरेथॉन स्पर्धा दिनांक २२ जानेवारी २०२५,रोजी किकवी येथे उत्साहात संपन्न.


सारोळे : ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलची तिसऱ्या वर्षाची मॅरेथॉन स्पर्धा दिनांक २२ जानेवारी २०२५, बुधवार रोजी किकवी येथे अत्यंत उत्साहात पार पडली.   NH4 नॅशनल सर्विस रोड किकवी येथून ३ कि.मी सारोळा स्टॉप पर्यंत व ५ कि.मी हॉटेल प्रणव पर्यंत स्पर्धा होती. यामध्ये एकूण २२८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामधून ५ कि.मी महिला खुला गट – १) सोनाली प्रसाद देवघरे (प्रथम क्रमांक) २)मनीषा गणेश गाडे (द्वितीय क्रमांक) ३) सोनाली अमित राणे (तृतीय क्रमांक) विजयी झाले.

तसेच ५ कि.मी पुरुष खुला गट-

१) दत्तात्रय गोरक्षनाथ पांगारे (प्रथम क्रमांक) २) राजेंद्र वसंत गुरव (द्वितीय क्रमांक) ३) हनुमंत सदाशिव सापटे (तृतीय क्रमांक) हे विजयी झाले.

शाळाबाह्य – ५ कि.मी १९ वर्षाखालील

मुले- १)आदित्य अनंतराव घोरपडे (प्रथम क्रमांक).

५ कि.मी १७ वर्षाखालील

मुली- १)सानिका कपिल येवले (प्रथम क्रमांक).

५ कि.मी १७ वर्षाखालील

मुले- १) धनाजी अरुण वऱ्हाडे.(प्रथम क्रमांक).२) स्वप्निल शिवाजी क्षीरसागर.(द्वितीय क्रमांक)३) सिद्धार्थ ज्ञानेश्वर राऊत (तृतीय क्रमांक)

३ कि.मी १४ वर्षाखालील

मुले-१) प्रथमेश विनोद कदम (प्रथम क्रमांक)२) वेदांत ज्ञानेश्वर भाटे.(द्वितीय क्रमांक) ३)अमित आनंदराव घोरपडे.(तृतीय क्रमांक)

तसेच, ऑक्सफर्ड स्कूलचे सहभागी विद्यार्थ्यांमधून

५ कि.मी १७ वर्षाखालील

मुली -१) सांजली राजलाल मांझी.(प्रथम क्रमांक) २) अनुष्का अमित तनपुरे.(द्वितीय क्रमांक) ३) प्रगती कल्याण लोहकरे (तृतीय क्रमांक )

मुले- १) संजेश राजलाल मांझी (प्रथम क्रमांक) २) प्रबुद्ध राजेश शिंदे.(द्वितीय क्रमांक) ३) आर्यन गजानन काकडे.(तृतीय क्रमांक)

३ कि.मी १४ वर्षाखालील

मुली- १) वैष्णवी गुरुनाथ आंदेवाडी. (प्रथम क्रमांक) २) स्नेहल गुरुचरण काकडे (द्वितीय क्रमांक) ३) सिद्धी महेश भोसले. (तृतीय क्रमांक)

मुले-१) सर्वज्ञ समीर गाडे (प्रथम क्रमांक) २) दिग्विजय नागराज पाटील (द्वितीय क्रमांक) ३) रौद्र सोमनाथ शितोळे. (तृतीय क्रमांक)

शारीरिक व मानसिक स्वास्थ राखणे, लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे तसेच स्पोर्ट्स कल्चरला प्रोत्साहन देणे हा स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश होता.

मॅरेथॉन स्पर्धेत प्रमुख उपस्थिती डॉ. प्रदीप शहा- हरीजिवन क्लिनिक, डॉ. मंदार माळी-इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर १०८ BVG, ADM सुजित पाटील,DM प्रियांक जावळे, झोनल मॅनेजर विठ्ठल बोडके, इमर्जन्सी सहकारी विशाल कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.

तसेच, हॉटेल इफोटेल बाय सयाजी, हॉटेल अमृता, हॉटेल प्रशांत, हॉटेल महालक्ष्मी, हॉटेल मल्हार,हॉटेल प्रणव यांनी पाणीवाटप व फळ देऊन स्पर्धकांना विशेष सहकार्य केले.

तसेच किकवी पोलीस स्टेशन, राजगड पोलीस स्टेशन, ट्राफिक कंट्रोल कापूरहोळ यांचेही बहुमोल सहकार्य मिळाले

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन कर्नल यशवंतराव बंडू रेणुसे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य  उमेश बन्सीलाल सोनावले व स्कूलच्या समन्वयीका जान्हवी उमेश सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन स्पर्धा खूप मोठ्या जल्लोषात पार पडली. स्कूलचे क्रीडा शिक्षक सौरभ चव्हाण, मंगेश गोळे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!