कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (तात्या) यांचे तिसरे मासिक संपन्न, तात्यांची आठवण पुरीगोसावी कुटुंबाला कायम राहणार :-
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी.
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांचे करंजखोप गावचे सुपुत्र आणि श्री. कालभैरव नाथांच्या नगरीतील सातारा करंजे पेठ येथील वास्तव्यास असणारे कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (तात्या) यांचे तिसरे मासिक पुरीगोसावी कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न, यावेळी तात्यांच्या आठवणीला पुरीगोसावी कुटुंबाकडून उजाळा मिळाला, ऐंन दिपावलीच्या आणि सण उत्सव काळात तात्यांनी अचानक भल्या मोठ्या कुटुंबाचा निरोप घेतला, जागरण गोंधळ तसेच रिक्षा व्यवसाय असल्यामुळे तात्यांचा दांडगा जनसंपर्क होता, तात्यांच्या अचानक जाण्यांने कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, कुटुंबात ते प्रमुख म्हणून ओळखले जायचे, भल्या मोठ्या पुरीगोसावी कुटुंबाचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात तात्या नेहमीच प्रयत्नशील राहिले, तात्याचे आज तिसरे मासिक संपन्न झाले, यावेळी सातारा जावली तालुक्यांच्या विद्यमान सभापती सौ. जयश्री ताई गिरी श्री. सुहास गिरी (दादा) यांनी उपस्थित राहून, तात्यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र वाहून अंतदर्शन घेतले, सौ. जयश्री ताई गिरी मॅडम यांचे तात्या मामा होते.