भोरमध्ये ‘नमो उद्यान’साठी १ कोटींची मंजुरी — आमदार शंकर मांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश
दि. 17 भोर :-शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मोठी बातमी समोर आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,
भोर–मुळशी–राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे,
भोर नगरपरिषद क्षेत्रात “नमो उद्यान” विकसित करण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे भोर शहरात हरित वातावरण, स्वच्छ हवा आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी, आकर्षक अशी विश्रांतीची जागा उपलब्ध होणार आहे.
नगरपरिषद प्रशासन लवकरच उद्यानाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देऊन कामाला सुरुवात करणार आहे.
नमो उद्यान भोरकरांच्या जीवनमानात नवी ऊर्जा व सौंदर्य निर्माण करणार आहे.