चोरांब्यात आज पासून नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा,ता.० ३ : सातारा जिल्ह्यातील आदर्श ग्राम म्हणून ओळख असलेल्या चोरांबे ता. जावली गावात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या याठिकाणी जिल्हाभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्सवाची जय्यत तयारी चोरांबे गावाने केली असून आज पासून विविध धार्मिक कार्यक्रम येथे पार पडणार आहेत.
चोरांबे ता. जावली गावातील ग्रामस्थांनी विविध क्षेत्रात काम करीत, विविध योजना गावात राबवित आपल्या गावाचा स्मार्ट ग्राम म्हणून जिल्हाभरात लौकिक मिळविला आहे. याच चोरांबे गावात पद्मावती देवीचे पांडवकालीन मंदिर होते. सन २००९ साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून दरवर्षी याठिकाणी नवरात्रोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याकाळात जिल्ह्यातून हजारो भाविक पद्मावती देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दिवसेंदिवस याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. या उत्सवकाळात नऊ दिवस देवीची विशेष पूजाअर्चा केली जाते. सकाळ संध्याकाळ देवीचा जागर केला जातो. तसेच मंदिरा समोरील दीपमाळ उत्सव काळात अखंड तेवत ठेवली जाते.
यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेदिवशी गावाला आदर्श गाव करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला भगिनींसाठी “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील दिवशी ह.भ.प संगीताताई चोपडे व ह.भ.प. अविनाश महाराज महाडिक यांच्या कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच याकाळात नऊ दिवस विविध भजन मंडळांची भजने देखील येथे पार पडणार आहेत.
आज पहिल्याच दिवसी श्री केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणीच करण्यात आली आहे.


