न्हावी, पेंजळवाडी मध्ये अजित दादा पवार यांच्या माध्यमातून१ कोटी ७७ लाख रुपये विकास कामाचा शुभारंभ.
दि. १३ सारोळे : पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत महायुतीच्या माध्यमातून
राज्याचे नेते तसेच लोकप्रिय उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भोर – राजगड – मुळशीचे युवा नेते, पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आणि माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भोर तालुका भाजपा अध्यक्ष जीवन कोंडे, आणि शिवसेना अध्यक्ष अमोलजी पांगारे या सर्वांच्या माध्यमातून न्हावी सर्वे नंबर ३२२ येथे ४०.५० लाख, पेंजळवाडी येथे ३०.५० लाख, न्हावी सर्वे नंबर १५ येथे १ कोटी ६ लाख असे एकूण १,७७,००,०००/- (एक कोटी सत्याहत्तर लाख रूपये) रुपयांच्या विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन कार्यक्रम नुकताच खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सर्वांचे मार्गदर्शक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य चंद्रकांत बाठे, भोर तालुका भाजपा अध्यक्ष जीवन कोंडे, भोर तालुका शिवसेना अध्यक्ष अमोलजी पांगारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेशजी निगडे, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रकाश तनपुरे, भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदार देशपांडे, भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल धुमाळ, शिवसेनेचे युवा नेते विकास चव्हाण, बारामती लोकसभा मतदार संघाचे युवा अध्यक्ष स्वप्निल कोंडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश खोपडे, नथुराम गायकवाड,अमीरजी बाठे आणि या सर्वांच्याबरोबर आलेल्या महायुतीचे बहुतांशी सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. भालचंद्र जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना मंजूर झालेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती देऊन भविष्यात सुद्धा यापेक्षा अधिकचा निधी आपल्याला मिळणार आहे त्यासाठी महायुतीचे सर्वजण कटीबद्ध आहोत असे सांगून जेष्ठ नेते आदरणीय अजितदादांनी महायुतीच्या माध्यमातून गोर – गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगून सर्व समाजघटकांसाठी मोफत तसेच अनुदानासह अनेक लोकोपयोगी योजना आणल्याचे सांगितले.
सांगता सभेसाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक गावचे मा. सरपंच अजित शिंदे यांनी केले. तसेच गावांच्या वतीने राजगड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, ज्येष्ठ नेते रवि सोनवणे, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे युवा नेते, पेंजळवाडीचे माजी युवा सरपंच विकासबापू चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच
आलेले सर्व नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार न्हावी सर्वे नंबर १५ चे सरपंच भरत सोनवणे आणि त्यांचे सहकारी न्हावी सर्वे नंबर ३२२ चे उपसरपंच शिवाजी भालेराव आणि त्यांचे सहकारी पेंजळवाडी चे सरपंच आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने करण्यात आला.
उपस्थित प्रमुख ग्रामस्थांमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रविदादा सोनवणे, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी सरपंच हभप वसंतबापू सोनवणे, विकास सोसायटीचे चेअरमन अंकुश चव्हाण, व्हा. चेअरमन दत्तात्रय सोनवणे, माजी चेअरमन नवनाथ सोनवणे, माजी व्हा. चेअरमन लहु चव्हाण, भरत चव्हाण, बाळू सोनवणे, गुलाब सोनवणे, युवा नेते विश्वजीत उर्फ धनंजय जगताप, प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे, अशोक सोनवणे, उदय कोंडे, विजू जगताप, बाबुराव चव्हाण (पो. पाटील), बाळासाहेब शिंदे, सुभाष चव्हाण, शरद लोहमकर, रामदास सोनवणे, राजेंद्र न. सोनवणे, उदय सोनवणे, प्रशांत व. सोनवणे, हरिश्चंद्र चव्हाण, पै. तुषार खोपडे, संदीप महांगरे, माऊली सोनवणे, वैभव सोनवणे, निलेश सोनवणे, नागेश नलावडे आदी उपस्थित होते.
आभार न्हावी स. नं. १५ गावचे सरपंच भरत सोनवणे यांनी मानले.


