14 वर्ष वयोगटामध्ये सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय निवड…
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
शिरवळ : खंडाळा तालुक्यामधून शिरवळ येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंची सन 24 -25 च्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये योगामध्ये मुलांच्या गटातून अरिहंत जाधव ,रिदमिक योगामध्ये अर्णव जाधव ,मुलींच्या गटातून रिदमिक योगामध्ये कादंबरी भोसलेचा प्रथम क्रमांक , बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलांच्या गटातून सार्थक धुमाळ या खेळाडूंची जिल्हास्तरीय निवड तसेच उंच उडी मध्ये साजन प्रजापती तृतीय क्रमांक व कुस्तीमध्ये 33 वजन गटातून उत्कर्ष पोटे हिने तृतीय क्रमांक मिळवलं.
या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षिका सुजाता बिराजदार, मयुरी गांधी, स्मिता आंबवडे यांचे संस्थापक व मुख्याध्यापक प्रतापराव निकम ,सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक संपत मगर, संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी पिसाळ,शिंदेवाडी चे उद्योजक दीपक जाधव , संस्थेचे सचिव मधुबाला निकम ,शिक्षक , पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.