सातारा जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी उंच भरारी योजना ! प्रशिक्षणाकरता भोरला पाठविण्यात येणार ! सातारा पोलीस दलामार्फत प्रशिक्षण देणार.
मंगेश पवार
प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी करण्यासाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील१८ ते ३० या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसाय करता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गुरुवार दि.२५/४/२४ रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची उंच भरारी योजना व लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने पोलीस कर्मणूक केंद्र, अलंकार हॉल सातारा येथे बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये प्रथम त्यांना लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सूचना देण्यात आल्या. तसेच उंच भरारी योजनेची संपूर्ण माहिती देऊन समाजातून जास्तीत जास्त युवक युवतींना उंच भरारी योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन मा अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल व मा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.

तसेच सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणारी उंच भरारी योजनेसाठी टीव्हीवर “मंजू कॉन्स्टेबल “मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणारी ” अभिनेत्री मोनिका राठी ” यांना महिला ब्रँड अँबेसिडर व सौरभ भोसले युट्युबर यांना पुरुष ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित करून उंच भरारी योजनेच्या टी-शर्टचे अनावरण केले. तसेच मोनिका राठी व सौरभ भोसले यांनी उपस्थित पोलीस पाटील व प्रशिक्षणार्थी यांना उंच भरारी योजनेचे महत्त्व सांगितले. तसेच कोंडवे ता सातारा या गावातील पोलीस पाटील बाबुराव गायकवाड यांनी उंच भरारी योजना सुरू झाल्यापासून या योजनेची माहिती त्यांच्या स्तरावर जनमानसामध्ये प्रसारित करून त्यांच्या मार्फत उंच भरारी योजनेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेतला असल्याने त्यांचा सत्कार मा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन भोर तालुका भोर जिल्हा पुणे यांचा माध्यमातून ४५ दिवसांचे प्रशिक्षणाकरता सातारा जिल्ह्यातून असिस्टंट इलेक्ट्रिशन ( हाऊसहोल्ड वायरिंग व सोलार ) या कोर्सचे प्रशिक्षणाकरता एकूण १९ युवकांना मा अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल व मा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व युवकांना वाहनातून ” भोर “येथे प्रशिक्षणाकरता रवाना केले.
सातारा जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने १) दुचाकी रिपेरिंग २) चार चाकी रिपेरिंग ३) हॉटेल मॅनेजमेंट ४) असिस्टंट इलेक्ट्रिशन ५) प्लंबिंग ६) वेल्डिंग ७) जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सचे प्रशिक्षणाकरता कोल्हापूर, भोर, अहमदनगर व छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.
तसेच या योजनेत समाविष्ट झालेले तरी युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय करतात कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


