परखंदी ते वाई रोडवर भैरोबा मंदिराच्या शेजारी वाई पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई*
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई पोलिसांनी दि. 23 मार्च रोजी रात्री पावणे सात वाजता वाई ते परखंदी जाणाऱ्या रस्त्यावर भैरोबाच्या मंदिराच्या शेजारी दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. बबन बाबूराव चव्हाण (वय 74 रा. परखंदी) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून 3360 रुपयांच्या 48 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. याचा तपास पो. कॉ. विशाल शिंदे हे करत आहेत.
पाण्यातील मोटरव केबलची चोरी
पाण्यातील मोटर व केबल ची चोरी या प्रकरणी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. 21 रोजी सायंकाळी 5.00वा. ते दि. 23 रोजी सकाळी
9.00 वा.चे. सुमारास अमृतवाडी ता. वाई गावचे हद्दीतुन म्हवटी नावचे शिवारातुन गट नं. 81
मधिल असलेल्या विहीरीतून दत्तात्रय शिवाजी बांदल फिर्यादी वय 50 वर्षे व्यवसाय शेती रा. अमृतवाडी यांच्या मालकीची शक्ती कंपनिची पाण्याची मोटर सिरीअल नं.2156883682 व मोटरीला जोडलेली अंदाजे 40 फुट निळ्या रंगाची केबल ही 42000/- रू. कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने चोरून नेहली आहे म्हणुन त्या अज्ञात चोरट्या विरूध्द फिर्यादी यांनी भुईंज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास भुईंज पोलीस करत आहेत.
किसन वीर कॉलेजच्या समोर दारुची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
दि. 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी वाई ते पाचगणी जाणाऱ्या रस्त्यावर किसन वीर कॉलेजच्या समोर दारु विक्रीसाठी घेवून जाणारा अविनाश आनंदराव सपकाळ रा. व्याजवाडी याच्यावर वाई पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याच्या ताब्यातून 2240 रुपयांच्या 32 देशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. त्याचा तपास पो. कॉ. शिंदे हे करत आहेत.

 
			

 
					 
							 
							