लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई साहेबांचा जयंती सोहळा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


 

 

सातारा पाटण प्रतिनिधी: शंकर माने

रविवार दि.१०:   वंदनीय लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई साहेबांची आज ११४ वी जयंती. त्यानिमित्त आज त्यांच्या जयंतीचा सोहळा दौलतनगर-मरळीमधील शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी कारखाना कार्यस्थळावरील स्व. लोकनेते साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

ADVERTISEMENT

 

यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. वंदनीय लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई साहेबांच्या विविध आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला. स्व. लोकनेते साहेबांनी घालून दिलेला उत्तुंग कार्याचा आदर्श आम्हास सदैव प्रेरणादायी आहे. त्या प्रेरणेतूनच पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच स्व. लोकनेते साहेबांनी दिलेला जनसेवेचा वारसा आम्ही पुढे नेऊ, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला.

 

यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार, उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!