महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
सातारा पाटण प्रतिनिधी : शंकर माने
रविवार दि.१० :महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आज शासकीय विश्रामगृह, पाटण येथे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक कार्यरत करण्यात यावा. या दूरध्वनी क्रमांकाची माहिती शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसमध्ये देण्यात यावी. तक्रार आल्यास पोलिसांनी दहा मिनिटांत तक्रारदारापर्यंत पोहोचावे. तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव पोलीस विभागाकडून गोपनीय ठेवण्यात यावे. ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे , त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या


