श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा वाई विधानसभा मतदारसंघ संवाद दौरा.
प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
सातारा लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज वाई शहरातील दाणेबाजार परिसरातील मंडई मध्ये भाजी विक्रेते, व्यापारी, तसेच नागरिकांशी चहा कट्टा निमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी संवाद साधला.
वाई शहरातील लोकांनी राजघराण्यावर आजपर्यंत भरभरून प्रेम केले, आमचे वाई शहराशी जुने ऋणानुबंध आहेत. या परिसरातील लोकांनी केलेल्या स्वागताने मन भारावून गेल्याचे महाराज म्हणाले.
यावेळेस पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या विकासावर बोलताना राम मंदिर, कलम ३७० असे अनेक धाडसी निर्णय मोदीजींनी घेतले.मोदीजींच्या हातात देश सुरक्षित आहे. मोदीजींच्या ३ ऱ्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जगाच्या ३ क्रमांकाची असेल असेही महाराज म्हणाले.
यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले,आर.पी.आय जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले,विजयसिंह नायकवडी,विकास शिंदे, चंद्रकांत भोसले,दीपक ननावरे,रोहिदास पिसाळ, RSS चे सदानंद लेले,विजय ढेकाने,अलंकार सुतार,तेजस जमदाडे, राकेश फुले,अमित वनारसे ,जयवंत पवार,गणेश शिंदे,नितिन विसापुरे,विशाल निकम,संजय शिंदे,विकास पवार,रणजित माने व इतर मान्यवर उपस्थित होते.


