बावधन येथे हाणामारी ; परस्पर विरोधात तक्रार .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील बावधन येथे घराच्या पाठीमागे कचरा जाळून धूर केला या मुळे दोन गटात हाणामारी झाल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आले आहेत. दस्तगीर मोमीन वय ३० याने जब्बार मोमीन, ताजू उद्दिन मोमीन, जैद मोमीन, शकीला मोमीन, लालाभाई मोमीन, मुजफ्फर मोमीन सर्व रा.बावधन यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे तर जब्बार मोमीन याने दस्तगीर मोमीन रा. बावधन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे दि. २१ रोजी १:३० वा.सुमारास बावधन येथे घडली घरामागे कचरा जाळला या कारणावरून लाकडी दांडके, लोखंडी रॉड, स्टील पाईप याने डोक्यात, पाटी मध्ये, हातावर व पायावर मारले आहे असे तक्रारीत म्हटले आहे याचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.


