शिवरे येथून मोटरसायकल आणि मोबाईलची अज्ञात चोरट्याने चोरी केली.
[
मंगेश पवार
नसरापूर : शिवरे येथून दुचाकी आणि तीन मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यश अनिल कोठावळे वय 19 राहणार सद्गुगुरु नगर भोसरी पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरे ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत सातारा रोडवर पुलाच्या खाली होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र. MH १४ KZ २५४१ आणि विवो कंपनीचे तीन मोबाईल किंमत अंदाजे १००००० रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. म्हणून यश कोठावळे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण करीत आहेत.