विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज- प्रा.डाॅ.प्रकाश पवार.
खंडाळा (सातारा) प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज प्रा.डाॅ.प्रकाश पवार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीसाठी लढले नाहीत तर तमाम शोषीत पिडीत वंचित मागासवर्ग आदिवासी महिला इ.घटकाऺच्या न्याय अधिकारासाठी लढले व घटकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले याबरोबरच त्यांनी एका ठराविक विषयांमध्ये प्राविण्य न दाखवता अनेक विषयांवर सखोल अभ्यास चिंतन करून त्यातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.अथक परिश्रम घेऊन भारतीय संविधान लिहण्यासोबत त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था,लोकसंख्या,कृषी, परराष्ट्र धोरण,शैक्षणिक धोरण, नदी जोड प्रकल्पाची संकल्पना, कामगारांचे अधिकार अशा अनेक विषयांवर त्यांनी योगदान दिले आहे त्यामुळे आजच्या पिढीने विशेषतः विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्यासोबतच इतर क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांनी दिलेल्या शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केले आहे.ते क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी राजेंद्र महाविद्यालय खंडाळा चे सेवानिवृत्त प्राध्यापक-जगन्नाथ विभुते यांनी देखील महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला यात महात्मा फुले यांना केवळ स्त्री शिक्षण व अस्पृश्यता निवारण या कार्यासाठी ओळखले जाते परंतु त्यांनी यापलीकडे जाऊन आपले जीवन व्यतीत केले आहे. त्यांनी महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह, पुनर्विवाह संकल्पना मांडली, केशवपन बंद केले, शेतकरी व असंघटितासाठी कार्य केले.याचबरोबर ते त्याकाळात ते फुलांचे व फळांचे प्रसिद्ध व्यापारी व मोठे बांधकाम व्यावसायिक होते असे नमूद केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.मिलींद मेश्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ प्राध्यापक डॉ.मुकुंद आमले व जयंती महोत्सव समिती अध्यक्ष प्रा.डाॅ.कविता मेश्राम-खिल्लारे, पशुसंवर्धन उपसंचालक डॉ कल्पना मुगळीकर व फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर चे अध्यक्ष प्रा.डाॅ.रोहीदास जाधव हे उपस्थित होते.यावेळी शिवतेज जाधव या विद्यार्थ्यांने पोवाड्याचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले.यावेळी महाविद्यालयाचे दर्शनी भागात बसविलेल्या संविधान उद्देशिके चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा,वादविवाद, वक्तृत्व,निबंध,रांगोळी व पोस्टर स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या तसेच सलग १२ तास अभ्यास अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक विद्यार्थी परिषदचे सहा.संचालक डॉ.अजित माळी यांनी केले तर डॉ.रुतुजा कांबळे व समता खंडीलोटे यांनी सुत्रसंचलन व शिवरत्न वायकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक शिक्षकेत्तर अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिमखाना प्रमुख डॉ.अविनाश कदम, डॉ.विकास वासकर,डॉ.विश्वास साळुंखे, डॉ.विट्ठल धायगुडे,डॉ.उमा तुमडाम,डॉ.गायत्री वानखेडे, डॉ.साईनाथ भोकरे,सहायक कुलसचिव राहुल ढोके,जनसंपर्क अधिकारी नितीन कदम,संजय जमदाडे व विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार शेंडे,श्रषीकेश मोकळ,राहुल गलगुडे,प्रेमसाई देसाई,पीयुष कांबळे,श्वेता गंभीरे,आकांक्षा डुबे,श्रुती सोनवणे इ.तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


