सिंहगड अँकँडमीत नवनियुक्त राज्य उत्पादन शुल्क जवानांचा सत्कार समारंभ संपन्न.
संभाजी पुरी गोसावी
शहरातील सिंहगड रोड परिसरातील पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र सिंहगड अँकँडमीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जवान पदाकरीता निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला.
सिंहगड अँकँडमी संचालक शैलेश निटूरे यांच्यावतीने प्रथमता राज्य उत्पादन विभागातील जवान पदाकरीता निवड झालेले यशवंत सोपान टोम्पे, प्रतिक्षा भिसे,आरती लाड्डे यांचा शाल,पुष्पहार,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना शैलेश निटूरे तर
सूत्रसंचालन विवेक धुमाळ यांनी केले. तद्नंतर यशस्वी विद्यार्थी यशवंतांनी मनोगत सादर केली. उपस्थितीत विद्यार्थी वैभव फिरंगे,गौरव भारती, हर्षल शिगवण, ओम क्षिरसागर, विनायक सुर्यवंशी व ऐश्वर्या गायकवाड, महानंदा कुसाळकर, श्रावणी, रोशनी,जान्हवी, संध्या चौरासिया, श्रृष्टी तेले, प्रियंका हंबीरसह कार्यक्रम समारोपावेळी अँकँडमी सहसंचालक दीपक सर, फॅकल्टी एस.एन. नांदेडकर यांच्यासह असंख्य विद्यार्थ्यी मोठ्या उपस्थितीत होते.