वाई पोलिसांकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत, सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल, गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी.
संभाजी पुरीगोसावी
सध्या वाई शहरांमध्ये नवरात्र उत्सवापासून दुचाकी चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असून. यामध्ये वाई पोलीस ठाणेकडील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीसही अलर्ट असल्याचे दिसून येते आहेत. यामध्ये वाई पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पथकांने चोरीस गेलेल्या सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. यामध्ये संशयित ( गणेश धनराज पिल्ले मु.पो. कोंढावळे ता.वाई जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मिळालेले माहितीवरून वाय पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना परखंदी रोडवर एक संशयित विना नंबर प्लेटची गाडी घेवुन फिरत दिसल्याने व त्याचा संशय बाळगल्याने पोलिसांनी त्याच्याकडे असणाऱ्या काळया रंगाच्या एक्टिवा गाडी बाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. यामध्ये सुमारे 3 लाख 50 लाख हजार किंमतीची पाच वाहने वाईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करण्यात यश मिळले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पो. कॉ.विशाल शिंदे पो.कॉ. राम कोळी पो. कॉ. नितीन कदम पो. कॉ. हेमंत शिंदे पो. कॉ. श्रावण राठोड पो.कॉ. रुपेश जाधव पो.कॉ. राम कोळेकर यांच्या पथकांने केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास अरुण पाटणकर उमेश गहीण लेंंभे करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.


