शिरवळ येथील ‘एचबी फुलर कंपनीच्या वतीने सारोळे गावात वृक्षारोपण.
संपादक :मंगेश पवार
सारोळे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिरवळ येथील नामांकित कंपनी एचबी फुलर यांनी सारोळे परिसरात ५० वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला.
जीवनात प्रत्येकाने एक तरी रोपटे लावून ते जगावावे. पर्यावरण ढासळत चालले असून समतोल राखण्यासाठी संघ-संस्थानी किमान आपापल्या भागात झाडे लावावीत आणि त्यांचे संगोपन करावे. शाळा-महाविद्यालयातूनही वनमहोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करावा, असा संदेश कंपनीचे प्लांट हेड योगेश खळदकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत कुलकर्णी आणि अश्विनी देवांगन यांनी यावेळी दिला.
प्रशांत कुलकर्णी आणि अश्विनी देवगन यांनी यावेळी वृक्षारोपण करून रोपट्याला पाणी देत पर्यावरण दिन साजरा केला.
याप्रसंगी सारोळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच झुंजार धाडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती भोर संचालक, मा. उपसरपंच,सदस्य महेश धाडवे, ग्रामपंचायत सदस्य काळूराम महांगरे, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ धाडवे, सुधाकर धाडवे, बाळासो पांगारे,यासह अन्य पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ मंडळ सारोळे उपस्थित होते.
नामांकित कंपनी एचबी फुलर कडून झाडे गावासाठी घेण्यासाठी सारोळे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते शेखर पवार यांचे मोलाचे योगदान लाभले. भविष्यामध्ये यापेक्षा जास्तीत जास्त झाडे सारोळे आणि आजूबाजूच्या गावाला कंपनीकडून घेण्याचा प्रयत्न करीन असे शेखर पवार यांनी सांगितले.


