वृक्षारोपणचा दुसरा वाढदिवस तहसीलदार समीर यादव यांच्या शुभहस्ते संपन्न.


सातारा

फलटण प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

अधिवक्ता परिषद फलटण यांच्यामार्फत फलटण येथील तहसीलदार मा.समीर यादव यांच्या हस्ते फलटण न्यायालयाच्या दक्षिण दरवाज्याच्या रोडलगत वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केलेले होते .सदर वृक्षारोपण पाच-सहा 2022 रोजी केल्यानंतर आज रोजी त्याचा दुसरा वाढदिवस साजरा केलेला आहे यावेळी अधिवक्ता परिषद अध्यक्ष ॲड.बापूसाहेब सरक ,उपाध्यक्ष ॲड.भानुदास शिर्के, फलटण वकील संघाचे सहसचिव ॲड.अर्जुन कोळेकर ॲड.अक्षय कोळेकर ॲड.रूपाली चांगण,ॲड.वंदना तसेच आप्पासो तांबे, पोलीस टाईमचे पत्रकार तसेच रामकुंड टॉवर सोसायटीमधील सदस्य श्री.यादव काका ,श्री.कदम व इतर नागरिक उपस्थित होते यावेळी झाडांना गांडूळ खत पाणी देऊन वृक्षारोपणाचे संगोपन करण्यासाठी परिश्रम घेतलेले नागरिक यांना पुष्प व पेढा देऊन त्यांचे अधिवक्ता परिषदेमार्फत सत्कार सन्मान केला यावेळी अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!