कुरुंगवडीमध्ये घराला आग लागून सिलेंडरचा स्फोट!चौघेजण जखमी 25 ते 30 लाखाचे नुकसान.
संपादक : मंगेश पवार
नसरापूर : कुरुंगवडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने घरात आग लागली असून आगीनंतर सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर आग विझवण्यासाठी गेले असता अचानक घरातील सिलेंडरचा स्फोट झाला यात चौघेजण गंभीर भाजले असून एक जण अत्यवस्थ आहे. सुदैवाने घरातील सर्वांना बाहेर काढल्याने मोठी जिवंत आणि टळली आहे.
कुरुंगवडी ( ता. भोर ) येथील संदीप संपत शिळीमकर आणि धनाजी संपत शिळीमकर यांच्या कौलारू घराला शॉर्टसर्किट झाल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली होती. संपूर्ण घर बेचिराख झाल्याने संसार उघड्यावर आला. ही घटना आज मंगळवार ( दि. ४ ) जून रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अग्निशामक दलाचा बंब पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घराची अक्षरश: राख झाली होती.
एका जखमीला सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग लागल्यानंतर घरातील सर्वजण बाहेर पडले तसेच शेजारील गोठ्यातील जनावरे बाहेर काढण्यात आली आग विझवत असताना अचानक सिलेंडर टाकीचा स्फोट झाला. आगीत संपूर्ण घर कवेत घेतले. घरातील रोख चार लाख रोकड आणि घरातील वस्तू जळून खाक झाल्या.


