पुण्यात ‘आम्ही भारताचे लोक’च्या वतीने पहिले राज्य स्नेह संमेलन
पुणे प्रतिनीधी | एस.एन.नांदेडकर
आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने पहिले राज्य स्नेह संमेलनपुण्यात ‘आम्ही भारताचे लोक’च्या वतीने पहिले राज्य स्नेह संमेलन उत्साहात पार पडणार आहे. दि. २ मे २०२६ रोजी निळू फुले सभागृह, दांडेकर पूल, पुणे येथे सकाळी ९.०० ते सायं ७.०० या वेळेत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी संदेश शालिनी संभाजी कडके हे असून, कार्याध्यक्ष म्हणून अँड. नितीन घोडके तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अविनाश मनवर कार्यभार सांभाळणार आहेत.
या संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांची देवाणघेवाण, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा तसेच एकात्मतेचा संदेश देण्याचा उद्देश आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीशी निगडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
“चला एकत्र येऊया, विचारांची देवाणघेवाण करूया आणि आंबेडकरी संस्कृतीचा जागर घडवूया” या संदेशासह आयोजकांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


