सारोळे येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न


मंगेश पवार

सारोळे (ता. भोर) : दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान असल्याने सारोळे येथील मंदिराची वार्षिक यात्रा काल मोठ्या भक्तिभावात पार पडली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. पारंपरिक विधी, पूजाअर्चा व दर्शनासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड यांनी मंदिरासाठी ₹११,००० रुपयांची देणगी दिली. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर प्रथमच मंदिरासाठी निधी अर्पण करत त्यांनी “खुर्चीवर बसल्यानंतर “कार्यभार स्वीकारल्यानंतर समाजोपयोगी व धार्मिक कार्यांसाठी नेहमीच योगदान देणार” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या देणगीचे उपस्थित भाविकांनी स्वागत केले.

ADVERTISEMENT

या यात्रेप्रसंगी भक्त शांताराम धाडवे,नारायण धाडवे विविध सेवा सोसायटीचे अध्यक्ष, धनंजय धाडवे, अमोल धाडवे, रमेश शि. धाडवे, रविंद्र धाडवे (अल्फा लावल युनियन अध्यक्ष), कमलाकर धाडवे, राजेंद्र धाडवे (मा. उपसरपंच), मोहन वाडकर, सावरदरे सरपंच गणेश साळुंके, रोहिदास धाडवे, आकाश जाधव, योगेश महांगरे, तानाजी महांगरे, शुभम भिलारे, सागर तनपुरे, बंटी धाडवे, मनीष धाडवे, बाबू साळुंखे, उदय शिंदे युवा नेते भोंगवली यांच्यासह अनेक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रेनिमित्त उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता, शिस्त आणि दर्जेदार जेवणामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे यात्रा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या यात्रेमुळे धार्मिक परंपरेला चालना मिळाली असून ग्रामस्थांमधील एकोपा आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!