जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे – व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विनोद चौधरी यांची पुनर्निवड


मंगेश पवार

दि. 19 सारोळे :– तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निगडे येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी भोर तालुका कोषाध्यक्ष विनोद चौधरी यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.

 

गेल्या दोन वर्षांत शाळेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पालक व सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. यापूर्वी अध्यक्ष म्हणून काम करताना चौधरी यांनी शाळेत शैक्षणिक तसेच भौतिक सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न करून चांगली कामगिरी केली होती.

 

पुनर्निवड झाल्यानंतर आपले विचार व्यक्त करताना विनोद चौधरी म्हणाले,

ADVERTISEMENT

“मला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, हे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या दोन वर्षांत शाळेच्या प्रगतीसाठी जे काम केले, त्याला पालकांनी आणि सदस्यांनी दाद दिली. पुढील काळात शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा उंचावणे आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.”

 

निगडे शाळेच्या पुनर्निवडीमुळे गावातील पालकवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून चौधरी यांना विविध स्तरांतून शुभेच्छा मिळत आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!