कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत त्वरित बैठकघ्यावी मा. ना. अनिल पाटील – मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य.
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
गेली सत्तर वर्ष कोयना धरणग्रस्त लोकांचा पुनर्वसन चा प्रश्न प्रलंबित आहे, साधारण पंधराशे ते अठराशे खातेदार हे पुनर्वसन अंतर्गत देय जमिनी पासून पुर्णतः वंचित आहेत आणि त्याही पेक्षा जास्त खातेदार हे अंशतः जमीन मिळालेले खातेदार असून त्यांना भेटलेली जमीन देखील पाटण जावळी महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरण जलाशयाच्या आजूबाजूच्या डोंगर उताराची असल्याने लोकांना कोणत्याही प्रकारचा जमिनीचा उपयोग झालेला नाही.
कोयना धरणग्रस्त वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून शासनाचे लक्ष आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचे यश म्हणून सातारा आणि सांगली जिल्हामध्ये जवळजवळ १२००च्या आसपास कोयना धरणग्रस्तांनी पर्यायी जमीन मागणीचे जमीन पसंत करून अर्ज केलेले आहेत. त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही पात्र प्रकल्प ग्रस्तांचा अहवाल संबंधित जिल्हाधिाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त यांच्याकडे आणि विभागीय आयुक्तांकडून मंत्रालय स्तरावर येणे गरजेचे होते तसे आजतागायत झाले नाही त्यामुळे कोयना धरणग्रस्त वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना भेटून याबाबत विचारणा करत होते .कोयना धरणग्रस्त लोकांचे जिल्हा स्तरावरील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटण्यासाठी जिल्हा स्तरावर आणि विभागीय आयुक्त स्तरावर बैठकी होणे गरजेचे आहे असे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. याबाबत कोयना धरणग्रस्त अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे संघटनेचे कार्यकर्ते चैतन्य दळवी, सचिन कदम, सीताराम पवार महेश शेलार, रामचंद्र कदम, विनायक शेलार, परशुराम शिर्के यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली.
कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या माध्यमातून कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात कोयनानगर येथे मेळावा आयोजित करण्यात आला. त्यानंतर पुनर्वसन मंत्री यांचे स्विय सहाय्यक श्री किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधून मंत्री महोदयांना भेटण्यासाठी वेळ मागून घेतली गेली त्या भेटीवेळी मा. ना . श्री.अनिल पाटील साहेब यांनी कोयना धरणग्रस्तांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत या बैठकीतून धरणग्रस्तांना जमीन मिळण्या साठीचा एक मार्ग चालू होईल असा विश्वास कोयना धरणग्रस्तांनी व्यक्त केला यासाठी विशेष सहकार्य. पुनर्वसन मंत्री यांचे खाजगी सचिव डॉ .नितीन महाजन, संजीव देशमुख, किशोर पाटील, दशरथ लवटे यांचे कोयना धरणग्रस्तांनी आभार मानले .