लातूर जिल्हा हादरला, सख्ख्या भावांनी कुरपणे बापलेकांना संपवले, जमिनीचा तुकडा ठरला जीवेघणा, तीन आरोपींना ठोकल्या बेड्या, कासार सिरसी पोलीस ठाणेचा फौज फाटा घटनास्थळी दाखल,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
शेत जमिनीचा वादांतून तीन संख्या भावंडांनी एकत्रित येत बाप लेकाला संपवल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील उस्तुरी येथे घडली आहे, या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, या गुन्ह्यातील तीन आरोपींना कासार सिरसी पोलिसांनी अटक केली आहे, याप्रकरणी कासार सिरसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या वादाचे रूपांतर हे हाणामारीत झाले बसवराज बिराजदार सुनील बिराजदार आणि लखन बिराजदार यांनी अचानक सुरेश बिराजदार आणि साहिल बिराजदार यांना जबर मारहाण केली, या मारहाणीत सुरेश बिराजदार आणि त्यांचा 22 वर्षाचा मुलगा साहिल बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे, काल संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे, घटनेची माहिती मिळताच कासार सिरसी पोलीस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, पोलिसांनी तात्काळ या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे, तर गणेश बिराजदार हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


