सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांनी स्वीकारला पदभार तर अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी यांची पुण्याला बदली.


 

संपादक :संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

राज्यांतील मागील काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते, त्यात सोबत जवळपास 11 अप्पर पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये प्रामुख्याने साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल पुणे येथे बदली करण्यात आली होती, तर त्यांच्या जागेवर सोलापूर पोलीस प्रशिक्षण प्राचार्य केंद्र सोलापूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली ईश्वर कडूकर यांची नियुक्ती करण्यात आली होती, दिनांक ५ ऑक्टोंबर 2023 रोजी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या बदलीनंतर सांगली अप्पर पोलीस अधीक्षक पदावरून सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी ते अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा देत आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या नावाचा ठसा चांगलाच उमटविला होता, सातारा जिल्हा पोलीस दलात दोनवेळा संधी त्यांना मिळाली होती, आँचल दलाल-डुडी या सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या त्या पत्नी होत्या, आता त्यांच्या बदलीनंतर नव्याने अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. वैशाली ईश्वर कडूकर यांनी आज आपला पदाचा पदभार स्वीकारला आहे, डॉ. वैशाली ईश्वर कडूकर या शिस्तप्रिय आणि डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात ओळख आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!