कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मंद्रुप पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, तर प्रशांत हुले यांची सातारला बदली.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
संभाजी पुरीगोसावी
सोलापूर ग्रामीण विभागातील आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज मनोहर पवार यांनी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्याकडूंन मंद्रुप पदभार स्वीकारला आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावचे सुपुत्र असून त्यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना ओळखले जाते, त्यांनी नव्याने मंद्रुप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, तर मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत घुले यांची नव्याने आता सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे, त्यांनीही सोलापूर ग्रामीण पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे.


